Nirmala Sitharaman Saree: मधुबनी साडी.. सोनेरी बॉर्डर…अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी आहे खास

Budget 2025 : आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. खरे तर, स्वतंत्र भारतातील त्या सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री ठरल्या आहेत.

आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी, निर्मला सीतारमण यांनी आपल्या संपूर्ण बजेट टीमसोबत औपचारिक फोटो सेशन केले. गेल्या ७ अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. यावेळीही त्यांनी एक विषेश प्रकारची साडी नेसली आहे.

यावेळी निर्मला सीतारमण यांनी पारंपरिक क्रीम कलरची ‘मधुबनी मोटिफ’ साडी परिधान केली आहे. या साडीवर मिथिला पेंटिंग करण्यात आले आहे. ही साडी त्यांनी डार्क लाल कलरच्या ब्लाउजसह परिधानकेली आहे. याच बरोबर, अर्थमंत्र्यांनी सोन्याच्या बांगड्या, गळ्यात चेन आणि कानातले घातलेलेही दिसत आहे.

कुणी केलीय डिझाईन? –
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मुधबनी पेंटिंग असलेली ही साडी त्यांना सौराठ मिथिला पेंटिंग इंस्टीट्यूटमध्ये मळाली होती. ही साडी त्यांना दुलारी देवी यांनी गिफ्ट केली होती. अशी माहिती जनता दल युनायटेडचे (जदयू) कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे, दुलारी देवी यांना 2021 मध्ये ‘पद्म श्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण सौरथ मिथिला पेंटिंग इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच उपक्रमासाठी मधुबनी येते गेल्या होत्या. तेथे त्यांची भेट दुलारी देवी यांच्याशी झाली होती. यावेळी त्यांच्यात बिहारमधील मधुबनी कलेसंदर्भात चर्चाही झाली होती. तेव्हा दुलारी देवी यांनी अर्थमंत्र्यांना ही साडी भेट म्हणून दिली होती आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी नेसावी, असे म्हटले होते.

गेल्या 5 अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांच्या खास साड्या…

  • 2024-25 च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी आंध्र प्रदेशची मंगलगिरी साडी नेसली होती. राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील ही साडी आहे.
  • 2024 च्या अंतरिम बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालच्या निळ्या कांथापासून विणलेली साडी नेसली होती.
  • 2023 च्या अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्र्यांनी लाल पेशम आणि सोन्याच्या बॉर्डरची साडी परिधान केली होती.
  • 2022 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ओडिशाची बोमकाई साडी नेसली होती.
  • 2021 च्या अर्थसंकल्पात पोचमल्ली इक्कत ही पारंपारिक तेलंगणाची साडी परिधान करण्यात आली होती.

मध्यमवर्गीयांमध्ये प्रचंड उत्सुकता

सकाळी 8.50 च्या सुमारास निर्मला अर्थ मंत्रालयात पोहोचल्या. त्यांच्या आधी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरीही मंत्रालयात पोहोचले होते. या अर्थसंकल्पाबाबत मध्यमवर्गीयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यावेळी मोदी सरकार मध्यमवर्गाला काहीतरी चांगलं मिळेल, असा विश्वास आहे. संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले होते की यंदा गरीब, मध्यमवर्ग आणि महिलांसाठी अनेक नवीन उपक्रमांची घोषणा केली जाऊ शकते. आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले पूर्ण अर्थसंकल्प असल्याचे वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले की, देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय समुदायावर लक्ष्मी देवीची विशेष आशीर्वाद राहो, अशी प्रार्थना त्यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 01-02-2025