Breaking : Union Budget 2025 Live Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात

◼️ शेतकरी, सर्वसामान्यांच्या अर्थशक्तीला वाढवण्याचा आमचा प्रयत्न : अर्थमंत्री

शेतकरी, सर्वसामान्यांच्या अर्थशक्तीला वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वसमावेशन विकासावर सरकारचा भर असणार आहे. भारताची अर्थव्यवस्था जलद गदीने वाढणारी आहे. भारताची योग्यता आणि सामर्थ्य यावर विश्वास ठेवत राष्ट्राची वाटचाल सुरु आहे. मागील दहा वर्षात विकास आणि सुधारणांनी जगाला आकर्षित केलं आहे.

◼️ कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी 5 वर्षांची योजना- अर्थमंत्री

कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी 5 वर्षांची योजना. सीफूड निर्यात 60 हजार कोटींवर पोहोचली आहे. युरियासाठी आत्मनिर्भरतेचे धोरण.

◼️ किसान क्रेडिट कार्डची लिमीट 5 लाख

◼️ कमी व्याजदरावर शेतकऱ्यांना 5 लाखांचं कर्ज मिळणार

◼️ कृषी, मध्यम आणि लघु उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात ही विकासाची इंजिन- अर्थमंत्री

कृषी, मध्यम आणि लघु उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात ही विकासाची इंजिन आहेत. पीएम धन धान्य योजनेचा 1.5 कोटी शेतकऱ्यांना लाभहोईल. ग्रामीण भागात पुरेशा सुविधा उपलब्ध केल्या जातील जेणेकरून स्थलांतराची समस्या सुटू शकेल. धान्याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न

यासाठी सहा वर्षांची मोहीम हाती घेतली जाईल. बिहारमध्ये मखाणा बोर्ड स्थापन केले जाईल. मखाणा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

  • – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 01-02-2025

Breaking : Union Budget 2025 Live Updates: लघू उद्योगांसाठी 5 लाखांचा क्रेडिट कार्ड दिले जाणार- अर्थमंत्री

◼️ MSME उद्योगांची लिमीट वाढवली जाणार

लघु उद्योगांसाठी 5 लाखांचा क्रेडिट कार्ड दिले जाणार

स्टार्टअपसाठी 20 कोटींपर्यंत लोनची सुविधा

◼️ एसी. एसटी उद्योजक महिलांसाठी विशेष योजना-अर्थमंत्री

एसी. एसटी महिला उद्योजिका ज्या पहिल्यांदा उद्योगात येत आहेत, अशांसाठी विशेष योजना सुरू केली जाईल. त्यांना 2 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

  • अर्थमंत्री निर्मला सीतारण

सर्व सरकारी उच्च माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड सुविधा मिळणार-अर्थमंत्री

◼️ सगळ्या सरकारी उच्च माध्यमिक शाळांना ब्रॉडबैंड सुविधा मिळणार

◼️ डिजिटल पुस्तके उपलब्ध केली जाणार

◼️ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुढील 5 वर्षात अतिरिक्त 75 हजार जागा उपलब्ध होणार

यावर्षी 200 कॅन्सर केअर डे केअर सेंटर सुरू करणार

◼️ कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) प्रशिक्षणासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार, त्यासाठी 500 कोटी खर्चाची तरतूद करणार

◼️ Budget 2025 Live: राज्यांना मिळून 1.5 लाख कोटींची रक्कम 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज – अर्थमंत्री

राज्यांना मिळून 1.5 लाख कोटींची रक्कम 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज म्हणून दिली जाणार, विविध योजनांवर, पायाभूत सुविधांवर खर्च करण्यासाठी ही रक्कम दिली जाणार