रत्नागिरी : आपल्याला नियम तोडल्याचा अभिमान वाटतो त्यामुळे ही मानसिकता बदलली तरच अपघात कमी होतील. त्यामुळे वाहतूकीचे नियम स्वतःपासूनच पाळले पाहिजे, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी एसटी विभाग नियंत्रक प्रद्येश बोरसे, वाहतूक पोलिस निरीक्षक आबासो पाटील, नवनिर्माण प्राचार्य सुकुमार शिंदे, आरटीओ वाहन निरीक्षक उदय साळुंखे, जयंत गुरव आदी उपस्थित होते. एस.पी. हेगशेट्ये महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात अप्पर पोलिस अधीक्षक म्हणाल्या की, रस्ते सुरक्षा बाबतीत आपण नियम पाळतो का, सुरक्षेचे नियम जसे की दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे, दारून पिता वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावता चारचाकी चालवणे, आदर्दीची सुरुवात स्वतः पासून करायला पाहीजे. आपल्याला नियम तोडल्याचा अभिमान न वाटता वाहतुकीचे नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. अपघातानंतर जर जीवीतहानी झाली तर त्या संपूर्ण कुटुंबाची हानी होते. आपल्याकडे हेल्मेटसक्तीविरोधात आंदोलने होतात, ही मानसिकता बदलली पाहीजे. त्यामुळे स्वतः पासून नियम पाळले पाहीजे, जेणेकरून अशा अभियानाची गरज भासणार नाही.
या कार्यक्रमाची प्रस्तावना शहर वाहतूक पोलिस निरीक्षक आबासो पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी वाहतूक नियमांबाबत करण्यात आलेल्या जनजागृतीबाबत माहिती देताना ही मोहीम केवळ सप्ताहानिमित्त नसून वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी वाहतुकीविषयक नवनिर्माण संस्थेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचा बक्षीस समारंभ पार पडला. निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक महाविद्यालय गट वैष्णवी दोडके, व्दितीय क्रमांक स्नेहा जाधव, तृतीय क्रमांक सारा तज्जुदीन मुकादम, नवनिर्माण शालेय गट प्रथम क्रमांक दुर्वांका कडवेकर, व्दितीय क्रमांक अनाया ठाकूर, नाझीस अलजी, ज्युनिअर कॉलेज-प्रथम क्रमांक प्रथमा थापा, व्दितीय क्रमांक असिफा होडेकर, तृतीय क्रमांक नायाब नेवरेकर, पोस्टर स्पर्धा- महाविद्यालयीन गट प्रथम क्रमांक-युसरा काझी, यश मयेकर, अफ्रा वाडकर, ज्युनिअर कॉलेज प्रथम क्रमांक इन्शा धामणस्कर, व्दितीय क्रमांक सलोनी सागवेकर, तृतीय क्रमांक नायबा नेवरेकर, शालेय गट प्रथम क्रमांक अरफा डिंगणकर, व्दितीय क्रमांक खेमराज गुप्ता, तृतीय क्रमांक दिलशा बेंद्रे याचबरोबर वाहतुकीबाबत जनजागृती करणारे पथनाट्य सादर करणारी टीम आणि प्रशिक्षक प्रा. सुशील साळवी, प्रा. निकिता नलावडे व विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला.
विना अपघात सेवा बजावणाऱ्यांचा सन्मान…
पोलिस दलात विना अपघात सेवा बजावणारे सहाय्यक पोलिस फौजदार मारुती धाकटू झोरे, विजय नारायण कदम, शैलेश शरद सावंतदेसाई आणि सहाय्यक फौजदार आखाडे यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 01/Feb/2025














