रत्नागिरी : कुंभ मेळ्यासाठी प्रयागराज येथे गेलेल्या रत्नागिरीतील भाविकांचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. इनोव्हा गाडीतून रत्नागिरीतील हे भाविक कुंभ मेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले होते. कुंभ मेळा करून रत्नागिरीकडे परतत असताना हा अपघात नाशिक रोड येथे झाल्याची माहिती मिळत आहे. या भाविकांच्या गाडीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपर ने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 01-02-2025














