Budget 2025 : पुढील आठवड्यात सादर होणार नवे इनकम टॅक्स विधेयक

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात आयकर स्लॅब काय असणार किंवा त्यात काय बदल होणार सर्वांना प्रतिक्षा असते. बजेट 2025 मध्ये इनकम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार याची उत्सुकता होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पुढील आठवड्यात संसदेत नवे इनकटॅक्स विधेयक सादर करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर अर्थमंत्र्यांनी 12 लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर असणार नाही असे त्यांनी जाहीर केले.

केंद्र सरकार जर नवीन कर विधेयक सादर करणार असेल तर करप्रणालीत मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवे विधेयक न्यायाची संकल्पना पुढे येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
>ज्येष्ठ नागरिसांसाठी TDSची मर्यादा 50 हजारावरून 1 लाख केली
>TDSमधील घरभाड्याची मर्यादा वाढवली
> income taxमध्ये दंड देण्यापेक्षा न्याय देण्याचा पर्यत्न
> आयकर भरण्याची मर्यादा 2 वर्षावरून 4 वर्षे इतकी करण्यात आली

> स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारावरून 75 हजार करण्यात आले

नव्या कर रचनेत मोठे बदल

१२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही
२४ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३०% कर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 01-02-2025