गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळे येथे माघी गणेशोत्सव उत्साहात संपन्न होत आहे.

तसेच आज दि.1/02/2025 रोजी स.6.30 वा. विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुषांजली, स.8. वा. आरती, स.9वा. गुरुकृपा मॉकटेल अँड मोअर LLp श्री. हदय आत्माराम लाड आणि श्री रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून सरबत वाटप, स. 11 ते 12.30 वा. जन्मोत्सव कीर्तन – बुवा आनंद ओळकर कशेळी दु. 12.30 वा. श्रींची पालखी मिरवणूक, दु.12.30ते उवा. गुरुकृपा मॉकटेल अँड मोअर LLp श्री. हृदय आत्माराम लाड आणि श्री रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून महाप्रसाद वाटप, कु. सार्थक प्रज्योत गुळेकर यांच्याकडून जिलेबी वाटप, श्री. रमेश राजाराम तोडणकर यांच्याकडून वडावाटप दु. 1 ते 2 वा. श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ आंबेशेत (रत्नागिरी) बुवा शुभम वायंगणकर दु.उवा. सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ भडे बुवा अशोक सुर्वे, सांय 4 वा. काडसिध्देवर प्रासादिक भजन मंडळ गणेशगुळे बुवा संदेश तोडणकर, सांय. 6 वा. आरती, रात्री 9 वा. नाटककार, देणगीदार आभार प्रदर्शन व क्रिकेट बक्षीस वितरण समारंभ, रात्री 10.30 वा. दोन अंकी कौटुंबिक विनोदी नाटक, नाथ हा माझा श्री. मधुसूदन कालेलेकर लिखित आणि श्री प्रकाश पेटकर दिग्दर्शित सादरकर्ते तोडणकर ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई.
दि.2/02/2025 रोजी स.6.30 वा. विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स.8वा. आरती, सांय. 6 ते 9वा. ढोलवादन स्पर्धा, रात्री 9.30 वा. ढोलवादन स्पर्धा बक्षीस वितरण, रात्री 10वा. दोन अंकी विनोदी मालवणी नाटक, झिलग्यांची खोली, श्री विश्राम सुत लिखित आणि श्री संदेश तोडणकर दिग्दर्शित सादरकर्ते सिध्दगिरी कलामंच गणेशगुळे आदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळे अध्यक्ष श्री. प्रसाद सुनिल तोडणकर, उपाध्यक्ष प्रज्योत मधुकर गुळेकर, सचिव प्रथमेश सुयकांत रांगणकर, सहसचिव राजेंद्र रमेश तोडणकर, कार्याध्यक्ष विक्रांत वामन रांगणकर, खजिनदार संतोष शांताराम गुळेकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी यानी परिश्रम घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 01/Feb/2025














