Maharashtra Rain Update : राज्यात आज ‘या’ ठिकाणी बरसणार पावसाच्या सरी

मुंबई : देशभरात पावसाने आपला परतीचा प्रवास सुरू केला असला तरी राज्यातील काही भागात मात्र पावसाने चांगलाच जोर धरण्याचे पहावयास मिळत आहे. मागील आठवडाभरात देशातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बिहार मध्ये तर पूरसदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात मात्र काही दिवसांपासून पावसासाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे.

आज कुठे पाऊस होणार?
दरम्यान महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, नगर, रायगड, धुळे, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर इतर भागात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची उघडीप राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबरमधील अंदाज जाहीर
ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) आणि मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात दक्षिण भारतात ११२ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या कालावधीत महाराक्षतही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

सप्टेंबरअखेर देशात ९३४.८ मिलिमीटर (८ टक्यो अधिक) पाऊस झाला, यंदाच्या हंगामात १२ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल आहेता मॉन्सून ३० मे रोजी केरळमध्ये पोहोचाता. जरबी समुद्रातून प्रगती करत ६ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर २३ जून रोजी मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला. तर, २ जुलै रोजी मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला.

मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर राज्यात पावसाचे वितरण असमान असल्याचे दिसून आहे. सह्याद्रीच्या कुशीतील धरणे यंदा ओसंडून वाहिली. राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ८७ टक्के पाणीसाठा झाला आहे कोयना, उजनी आणि जायकवाडी धरणांत 100 टक्के पाणीसाठा असून, सर्वच मोठ्या परणांमध्ये यंदा समाधानकारक पाणी जमा झाले आहे.