रत्नागिरी : देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे हे रविवारी 2 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत.
रविवारी सकाळी 9.35 मी ते मुंबई येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी साठी रवाना होतील. सकाळी 10.45 मी. तटरक्षक दल, रत्नागिरीच्या विमानतळावर त्यांचे आगमन होईल. रत्नागिरीमध्ये खा. राणे हे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन मंडळाच्या सभागृहात नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी सकाळी 11.30 वाजता उपस्थित राहणार आहेत. तर दुपारी 3.05 मी हेलिकॉप्टरने खा. राणे सिंधुदुर्गला रवाना होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 01/Feb/2025














