रत्नागिरी : पोलिसांच्या व्यावसायिक कामगिरीची गुणवत्ता वाढावी, याकरिता सन १९५३ पासून भारतामध्ये अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावा आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने गुन्हे तपासाच्या अनुषंगाने मदत ठरणारे शास्त्रीय व तांत्रिक मदतीच्या स्पर्धेचा समावेश असतो. त्या अनुषंगाने १९ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा पोलिस अधीक्षक कार्यालय पालघर येथे दि. २४ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पार पडला.
महाराष्ट्रामध्ये सी. आय. डी. क्राईम यांच्याकडे राज्य पातळीवर पोलीस कर्तव्य मेळावा आयोजित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली असून तत्पूर्वी परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळावा संबंधित सर्व परिक्षेत्रांमध्ये आयोजित करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने १९ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर येथे दि. २४ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यामध्ये रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे ग्रामीण व पालघर या जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले होते. पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सायंटीफ एड टु इन्व्हेस्टीगेशन, पोलिस फोटोग्राफी, पोलिस व्हिडीओग्राफी, कॉम्प्युटर अवेअरनेस आदी स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला होता.
या कर्तव्य मेळाव्यात रत्नागिरी जिल्हयाने १ गोल्ड, ४ सिल्वर, ५ ब्रांझ पदके प्राप्त केली. तसेच पोलीस फोटोग्राफी स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेता म्हणून रत्नागिरी जिल्ह्याला चषक प्राप्त झालेला आहे. यामध्ये १) सायंटीफ एड टू इन्व्हेस्टीगेशन (फॉरेन्सीक टेस्ट) ब्रांझ पदक पदक विजेते शिवराज शामराव खराडे पोलिस उपनिरीक्षक, २) पोलिस फोटोग्राफी सुवर्णपदक विजेते पोलिस, हवालदार अमोल गमरे, ३) पोलिस व्हिडीओग्राफी ब्राँझ पदक विजेते महिला पोलिस शिपाई पुजा गायकवाड, ४) कॉम्प्युटर अवेअरनेस सिल्वर व ब्रांझ पदक विजेते पोलिस शिपाई सुरज सुर्वे, ५) गुन्हे श्वान पथक ब्राँझ पदक विजेते चान रॅम्बो, प्रथम हस्तक पोलिस हवालदार भूषण अनंत राणे, द्वितीय हस्तक पोलिस हवालदार वैभव चंद्रकांत आंब्रे, ६) अमली पदार्थ विरोधी तपासणी ब्राँझ पदक विजेते धान व्हीक्टर, प्रथम हस्तक पोलिस हवालदार, सूरज भोळे आदी विजेत्यांचे रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, राधिका फडके यांनी अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 02/Oct/2024














