खेड : खेड तालुक्यातील घेरा पालगड किल्ले माची या गावांमध्ये शॉर्टसर्किटमुळे दोन गुरांच्या गोठ्यांना मोठ्या प्रमाणावरती आग लागली. या आगीमधून ३ गुरांना वाचवण्यात यश आले. मात्र १ बैल गंभीरित्या भाजला ज्या ठिकाणी ही आग लागली त्या ठिकाणी असलेल्या उडव्या जळून खाक झाल्या. हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी गुरांचा गोठा आहे, त्याच्यानजीक ग्रामस्थांची घरे देखील आहेत. खेड नगरपालिका अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने गोठ्यांना लागलेली आग विझवण्यात आली. तर घरांच्या दिशेने जाणारी आगसुद्धा विझवण्यात आली. किल्ले माची या ठिकाणी आग लागल्याचे समजताच खेड नगरपालिका अग्निशामक दलाचे जवान फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, जयेश पवार, प्रणय रसाळ, गजानन जाधव यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन मोठी हानी टळली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 01/Feb/2025









