रत्नागिरी : केरळमधून मासेमारीसाठी रत्नागिरी समुद्रात आलेल्या खलाशांची बोट नादुरुस्त झाली. बंद पडलेली बोट कस्टमच्या अखत्यारित दुरुस्तीसाठी मिरकरवाडा बंदराकडे येत असताना त्या बोटीमधील सवस्टेन एस (वय ४६, रा. तिरुअनंतपुरम्, केरळ) या खलाशाला अचानकपणे चक्कर आल्याने तो बेशुध्द पडला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 03/Feb/2025














