चिपळूण : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना शेतीमध्ये पारदर्शक काम व्हावं म्हणून महाडीबीटी योजना आखली आहे, शेतकऱ्यांचे हजारो अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत ऑनलाइन मागवण्यात आले आहेत. परंतु दोन वर्ष या योजनेची सोडत म्हणजेच लॉटरी काढण्यात आलेली नसल्यामुळे शेतकरी अडचणी सापडलेले आहे.
महाराष्ट्राचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे असे वारंवार मंत्री व अधिकारी सांगत असतात मग शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला विलंब का केला जातो? असा प्रश्न माझी सभापती शौकत मुकादम यांनी उपस्थित केला आहे.
तरी शासनाकडे ऑनलाईन अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत साहित्य पुरवण्यासाठी जे मागवण्यात आलेले आहेत, त्याची सोडत म्हणजेच लॉटरी दोन वर्ष काढण्यात आलेली नाही. ही खेदजनक बाब आहे. तरी ती लॉटरी ताबडतोब काढण्यात यावी, अशी मागणी चिपळूण पचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
वरील योजनेमध्ये ट्रॅक्टर, पावर टिलर अशी शेती उपयोगी अवजारे अनुदान तत्वावर पुरवली जातात. लॉटरी कधी निघणार याची वाट गेली दोन वर्ष शेतकरी बघत आहेत. त्यामुळे डीबीटी योजनेंतर्गत तातडीने लॉटरी काढून संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 03/Feb/2025














