चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात गाडी अडवून मारहाणी केली याबाबत पोलीस स्थानकात फिर्यादीने तक्रार केली होती. त्यामुळे या प्रकरणातील अटक होणार असल्याने त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जाचा विचार करून त्यातील फहद खान, फैजल खान व महमद खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटी-शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर करून दिलासा दिला आहे. तर पोलिसांसमोर तपासासाठी हजर राहण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.
या प्रकरणाची सुनावणी लवकरच होणार असून त्यापूर्वी या तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमुर्ती एन.आर. बोरकर यांनी हा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील फहद खान, फैजल मेमन आणि महमद खान यांच्याविरोधात परशुराम घाटात मारहाण केल्याचा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून या तिघांनी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. त्या अर्जावर आज सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने याप्रकरणी निर्णय दिला. फहद खान, फैजल मेमन आणि महमद खान यांच्या वतीने ॲड. आदित्य शर्मा, शैलेश चव्हाण आणि (कौन्सिलर अँड कुलदीप पाटील यांनी बाजू मांडली. त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरित न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. ही सर्व सुनावणी मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती एन. आर बोरकर यांच्या कोर्टात झाली. युक्तिवादानंतर न्यायमूर्ती यांनी तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. आतापर्यंत गुन्हा दाखल झालेल्या पाचजणांना पुराव्या अभावी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आता पुढे या प्रकरणाबाबत नेमके काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 03-02-2025













