रत्नागिरी : जिल्ह्यातील बेकारीच्या प्रश्नावर लवकरच बैठक- खा. नारायण राणे

रत्नागिरी : जिल्ह्यात वेगवेगळे उद्योग आणावेत यादृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. उद्योग आले तरच उत्पत्न्न वाढणार आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा बेकारीचा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी काय करता येईल यावर निर्णय घेतले जातील. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल, असे प्रतिपादन खासदार नारायाण राणे यांनी केले.

रत्नागिरीवील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणे म्हणाले, जिल्ह्याचा विकास दर वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आजच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीतही त्यावर चर्चा झाली. कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. रखडलेल्या महामार्गाविषयी पत्रकारांनी विचारले असता सध्या काम वेगाने सुरू असून २०२५ च्या पावसापूर्वी महामार्ग पूर्ण होईल.

मुंबई-गोवा महामार्गाचे बहुतांशी काम येणाऱ्या पावसापूर्वी करू, असे आश्वासन संबंधित ठेकेदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दिले आहे. त्यामुळे महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे.

ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांवर राणे यांना विचारले असता ते म्हणाले. संजय राऊत यांना चांगलं दिसत नाही. से ज्या बातम्या देतात, त्या सगळ्या खोट्या असतात. दिशाभूल करणाऱ्या असतात. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत. काही दिवस ते गप्प होते. मात्र, पुन्हा कामाला लागले आहेत. त्यामुळे राऊतला चांगलं दिसत नसल्याने असे अपशब्द वापरतात. त्याला एके दिवशी चांगलं बोलायला आम्ही शिकवू.

विकासासाठी पुरेसा निधी मिळेल
जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी पुरेसा निधी आता मिळेल, असे आश्वासन खासदार राणे यांनी दिले. ते म्हणाले, राज्याच्या अर्थमंत्र्यांन भेटून त्यांच्याकडे अधिकच्या ६३८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली जाणारा आहे. त्यामुळे यापूर्वीप्रमाणे निधीची कमतरता जाणवणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 03/Feb/2025