रत्नागिरी : तालुक्यातील पाली-जानम चाळ येथील घरासमोर पार्क केलेला दहा लाखांचा जेसीबी चोरून नेला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध देवरुख पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश कृष्णा राणे (रा. सद्गुरू कॉम्प्लेक्स नवीन बाजारपेठ लांजा) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २३ मार्च २०२३ सकाळी आठ या कालावधीत घडली आहे. फिर्यादी जेसीबीचालक अनिल सोमू राठोड (वय ३६, रा. पाली जानम चाळ, रत्नागिरी. मूळ : इंगळेश्वर, ता. बसतबागेवाडी, जि. विजापूर, कर्नाटक) यांनी सत्यवान खेडेकर यांच्या घरासमोर जेसीबी (एमएच-०८-जी-९३७०) हा पार्क करून ठेवला होता. संशयिताने तो पळविला.
या प्रकरणी राठोड यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 03/Feb/2025














