रत्नागिरी : ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ (डब्लूआयआय) आणि कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभाग यांच्या माध्यमातून गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या एकूण ३१ मादी कासवांना ‘फ्लिपर टॅग’ करण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणात अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांची दीर्घकालीन नोंद ठेवण्यास मदत मिळणार आहे. रत्नागिरीतील तीन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी येथून जास्तीत जास्त कासवांना टॅग करण्यात येणार आहे.
सागरी कासवांच्या स्थलांतराचा करण्यासाठी वन विभागाच्या ‘कांदळवन कक्षा ने ‘डब्लूआयआय’च्या मदतीने २०२१-२२ मध्ये एकूण सात कासवांवर ‘सॅटलाईट टंग’बसविले होते. मात्र, काही महिन्यात ते अकार्यान्वित झाले. याच पार्श्वभूमीवर कासवांच्या परांवर सांकेतिक धातूची पट्टी बसविण्याचा प्रयोग करण्यात येत आहे. या कामाला गुरुवारपासून गुहागर येथील किनाऱ्यावरून आरंभ झाला.
गुहागर किनाऱ्यावर सात माद्या अंडी घालण्यासाठी आल्या होत्या त्यातील तीन माद्या या अंडी न घालता परतल्या, बाग गुहागर, बाजारपेठ पोलिस चौकी आणि वरचा पाट येथील खरे गल्ली येथील किनाऱ्यावर अंडी घातलेल्या चार मादी कासवांना तज्ज्ञ फ्लिपर टंग लावून पुन्हा पाण्यात सोडले. त्यानंतर ३१ जानेवारीला १६ मादी कासवांना टंग करण्यात आले. पुढे १ फेब्रुवारीला ११ कासवांना टॅगिंग केले गेले आहे.
कासवांना ‘फ्लिपर टंग’ लावल्यास ते किती वर्षानंतर पुन्हा किनाऱ्यावर आले याची माहिती टंगवरील क्रमांकानुसार समजते. गुहागरमधील चार कासवांच्या पुढील प्रत्येकी दोन परांवर सांकेतिक क्रमाकाचे टॅग लावण्यात आले आहेत. पहिले टॅगिंग केले त्यावेळी कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये, सहाय्यक उपजीविका तज्ज्ञ अभिनय केळस्कर, प्रकल्प समन्वयक रोहित बिर्जे, सह्याद्री संकल्प सोसायटीचे अध्यक्ष भाऊ काटदरे, सागर रेडीज वनसंरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, डब्लूआयआयच्या सहा. संशोधक निधी म्हात्रे यांच्यासह संजय भोसले, विक्रांत सांगळे, रवींद्र बागकर, कुसमाकर बागकर, शार्दुल तोडणकर, आकाश जांगली, दिलीप सांगळे आदी उपस्थित होते.
सागरी कासवांची होणार गणना
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल (एमओईएफ) मंत्रालयाच्या ‘व्यापक एकात्मिक वन्यजीव अधिवास विकास’ (आयडीडब्लूएच) या योजनेचा भाग म्हणून पूर्ण भारतभर सागरी कासवांच्या संख्येच्या अंदाज घेण्यात येणार आहे. “राष्ट्रीय सागरी कासव कृती आराखडा, २०२९-२६” या आरखळ्यातील तरतुदीनुसार ‘डब्लूडब्लूआय ‘मार्फत भारतातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर सागरी कासवांची गणना करण्यात येणार आहे.
असे केले जात टॅगिंग
वाळूत खड्डा करून अंडी घालतेवेळी मादी कासवांची शुद्ध हरपते. त्यावेळी त्यांना टंग लावलेले समजत नाही, म्हणून त्या अंडी घालण्याची वाट बघण्यात येते आणि त्यानंतर अंडी घालतानाच त्यांना टंग लावले जाते. या फ्लिपर टॅगवर कोड आणि नाव असते. त्यामुळे ते कासव कोणत्याही किनाऱ्यावर आढळले, तर त्याची माहिती मिळू शकेल.
प्रधान मुख्य वनसंरक्षक 60 (वन्यजीव) आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) यांच्यामार्फत सागरी कासवांनी ‘फ्लिपर टॅग’ लावण्याचा प्रकता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविला जात आहे. यंदां जास्तीत जास्त कासवांना टॅग केले जाणार आहे. त्यासाठी रत्नागिरीतील वेळास, आंजर्ले, गुहागर आणि सिंधुदुर्गातील वायंगणी या किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी घेणाऱ्या कासवांना फिल्पर टॅग लावण्यात येईल. कांचन पवार, विभागीय वन अधिकारी, कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 03/Feb/2025














