खेड : आय.सी.एस. महाविद्यालयात हिंदी पखवडा समापन

खेड : येथील आय. सी. एस. महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त आयोजित हिंदी पखवडा समापन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रभाषा प्रचार समितीचे जिल्हा संघटक प्रा. गोविंद राठोड, प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. विद्या शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रम आरंभ करण्यात आला. प्रास्ताविक करताना डॉ. विद्या शिंदे यांनी गेले पंधरा दिवस हिंदी दिनानिमित्त ज्या स्पर्धा घेण्यात आल्या, त्याची माहिती दिली. प्रमुख अतिथी पदावरून अनिलकुमार जोशी म्हणाले, आजच्या तरुण पिढीने हिंदी प्रचार, प्रसार करण्याचं कार्य हाती घेतलं पाहिजे, तरच आपल्या राष्ट्रीय अस्मितेची जपणूक होईल, तर क प्रा. राठोड म्हणाले, राष्ट्रभाषेचं संवर्धन व जपणूक ही काळाची गरज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 02/Oct/2024