रत्नागिरी जिल्हा तेली प्रिमीअर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये चिपळूण इलेव्हन विजेता तर राऊत रॉकर्स उपविजेता

मोडकाआगर : चिपळूण तालुका तेली समाजसेवा संघाच्या वतीने रत्नागिरी जिल्हा तेली समाज प्रिमीअर लीग क्रिकेट स्पर्धा पवन तलाव मैदान, इंदिरा सांस्कृतिक केंद्र जवळ चिपळूण येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विनोद झगडे, चिपळूण तालुका तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ बापू राऊत, सेक्रेटरी दिनेश लांजेकर, कार्याध्यक्ष गजानन महाडिक, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सह सेक्रेटरी राम रहाटे, खजिनदार दिनेश इंगवले, सह खजिनदार दीपक महाडिक,महिला जिल्हाध्यक्ष श्रेया महाडीक अनिल लांजेकर, विवेक महाडिक, उमेश महाडिक, अमोल महाडिक आदी मान्यवरांसह तेली समाजातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रणव विनोद झगडे व सिद्धार्थ झगडे यांचा चिपळूण इलेव्हन हा संघ विजेता ठरला असून सचिन राऊत व प्रवीण राऊत यांचा राऊत रॉकर्स हा संघ उपविजेता ठरला आहे. तृतीय क्रमांक रुद्र इलेव्हन कळमुंडी, चतुर्थ क्रमांक आम्ही तेली इलेव्हन चिपळूण गुहागर या संघाने पटकावले.

विजेत्या संघांना सन्मानचिन्ह व रोखं पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साहिल लांजेकर(तेली इलेव्हन स्टार), उत्कृष्ट गोलंदाज अक्षय करळकर (चिपळूण इलेव्हन), उत्कृष्ट फलंदाज चेतन पावसकर (रुद्र इलेव्हन), मालिकावीर किरण पावसकर( राऊत रॉकर्स ),अंतिम सामन्याचा सामनावीर संतोष कळलकर (चिपळूण इलेव्हन) या सर्वांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण १० संघ तर १५० खेळाडू यांचा सहभाग होता. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉ.भूषण कर्डिले, सचिव सुनील चौधरी, कोंकण विभागीय अध्यक्ष सतीश वैरागी, जयेश भागडे, रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार, कार्याध्यक्ष दीपक राऊत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती व शिवसेना उबाठा गटाचे चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे, पोलीस सब इन्स्पेक्टर प्रमोद झगडे, महिला कोकण विभागीय अध्यक्ष प्रिया भोपाळकर, महिला जिल्हाध्यक्ष श्रेया महाडीक, जिल्हा युवक अध्यक्ष समीर महाडिक,चिपळूण तालुका तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ बापू राऊत, गुहागर ता.अध्यक्ष प्रकाश झगडे, सचिव प्रवीण प्रकाश रहाटे , चिपळूण ता.सेक्रेटरी दिनेश लांजेकर, कार्याध्यक्ष गजानन महाडिक, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सह सेक्रेटरी राम रहाटे, खजिनदार दिनेश इंगवले, सह खजिनदार दीपक महाडिक, चिपळूण ता. महिला अध्यक्ष स्वाती महाडिक, गोवर्धन महाडिक उपस्थित होते या स्पर्धेसाठी चिपळूण तालुका तेली समाजसेवा संघाचे सर्व पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व तेली समाज बांधव यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:11 03-02-2025