भारतीय तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिवस

रत्नागिरी : सागरी हिताचे रक्षण करण्यासाठी आणि देशाच्या सागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, भारतीय तटरक्षक दल 01 फेब्रुवारी 1977 रोजी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संघाचे सशस्त्र दल म्हणून अस्तित्वात आले.

भारतीय नौदलाकडून हस्तांतरित केलेल्या दोन लहान कार्वेट्स आणि पाच गस्ती नौक या तुटपुंज्या साधनांसह, भारतीय तटरक्षक दलाने ‘वयम् रक्षाम:’ म्हणजेच ‘आम्ही संरक्षण करतो’ या ब्रीदवाक्याने आपले कार्य सुरू केले. आज त्याच्या अस्तित्वाच्या 49 वर्षांनंतर, भारतीय तटरक्षक दलाने स्वतःला जगातील चौथ्या क्रमांकाचे कोस्ट गार्ड म्हणून प्रस्थापित केले आहे ज्यात आता 151 जहाजे आणि 76 विमाने आहेत जी भारतीय किनारपट्टीच्या 7500 किमी अंतरावर तैनात आहेत.

दरवर्षी भारतीय तटरक्षक दल तटरक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करते. 49 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने, भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीने 01 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या रत्नागिरी आणि भारतीय तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरीच्या कमांडिंग ऑफिसरसह जिल्ह्यातील सरकारी, कॉर्पोरेट आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत युनिट परिसरात स्थापना दिना निमित्त एक समारंभ आयोजित केला होता.

कार्यक्रमादरम्यान, भारतीय तटरक्षक दलाच्या वर्षभरातील कार्याचे आणि जबाबदाऱ्यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्यानंतर संगीत आणि नृत्य कार्यक्रमांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम झाला. भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या कमांडिंग ऑफिसरने तटरक्षक दलाला आपल्या जबाबदारी पार पाडताना निरंतर सहकार्य केल्याबद्दल निमंत्रितांची कृतज्ञता व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:11 03-02-2025