रत्नागिरी : श्रीमंत पेशवाई चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ उत्साहात

रत्नागिरी : श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव, श्री हनुमान मित्र मंडळ, मारुती आळी, रत्नागिरी आयोजित व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तिसरी श्रीमंत पेशवाई चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ रोजी राधाकृष्ण मंदिर, राधाकृष्ण नाका, रत्नागिरी २ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात सुरवात झाली.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मारुती आळी येथील श्री हनुमान मित्र मंडळाचे सल्लागार प्रमोद शेरे, अध्यक्ष मंगेश संसारे, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, स्पर्धा आयोजक मिलिंद दळी, स्पर्धा प्रमुख सचिन बंदरकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद साप्ते, प्रमुख पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी व बहुसंखेने खेळाडू उपस्थित होते.

स्पर्धेचा लहान गटातील मुलांचा बक्षीस समारंभ श्री हनुमान मित्र मंडळाचे सदस्य मिलिंद दळी, राजू खेडेकर, सुनील गांधी, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे खजिनदार नितीन लिमये, सचिन बंदरकर, मिलिंद साप्ते, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सदस्य विवेक देसाई, प्रमुख पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला.

स्पर्धेचा कुमार किशोर व किशोरी गटाचा निकाल : कुमार गटाच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या ओम पारकर याने राजापूरच्या हर्षल पाटील याचा १२-०१, १३-०७ असा पराभव केला. कुमार गटाच्या उपान्त सामन्यात ओम पारकर याने आर्यन राऊत तर हर्षल पाटील याने द्रोण हजारे याचा पराभव केला. किशोर गटाच्या अंतिम सामन्यात वेदांत कनगुटकर याने तौहीद साटविलकर याचा १३-१२, ११-०२ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. किशोर गटाच्या उपांत्य सामन्यात वेदांत कनगुटकर याने सार्वेश आमरे याचा, तर तौहीद साटविलकर याने आयन कालकर याचा पराभव केला. किशोरी गटात राजापूरच्या निधी सप्रे हिने रत्नागिरीच्या स्वरा मोहिरे हिचा १३-१२ व १५-०६ असा सरळ दोन सेट मध्ये पराभव केला. किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात निधी सप्रे हिने स्वरा कदम हिचा तर स्वरा मोहिरे हिने सृष्टी चवंडे हिचा पराभव केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 03-02-2025