2029 मध्ये अमित शाह दिल्लीत पण नसतील, सध्या ते स्वतः कुबड्या घेऊन सत्तेत : विजय वडेट्टीवार 

मुंबई : 2029 मध्ये अमित शाह (Amit Shah) दिल्लीत पण नसेल, सध्या ते स्व:ता कुबड्या घेऊन सत्तेत आहे. घोटाळे करणारे हे सरकार आहे. महाराष्ट्राला हे सरकार नको आहे. कॅबिनेटमध्ये सरकार दिवाळीखोरी करत असल्याची नोंद आहे.

त्यामुळे आगामी काळात सत्ता तर दूर यांना राज्यात फिरणेही अवघड होईल, असा टोला विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला लगावला आहे.

भाजप दुतोंडी साप, जिकडे भक्ष्य तिकडे जातात. वापर झाला की फेकून देतात. जागा वाटपात आम्ही खूप पुढे गेलो आहोत. नवरात्रीमध्ये अधिकाधिक जागा आम्ही घोषित करू. तर बऱ्याच जागांवर एकमत झाले आहे. तसेच उरलेल्या जागांवर 8, 9,10 ला सलग बैठक आहे. देवीचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, असा विश्वासही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला आहे.

ओबीसी आंदोलन दाबण्याचा प्रकार हाकेच्या निमित्याने होत आहे- विजय वडेट्टीवार

राज्यातील 38 जागेवर मैत्रीपूर्ण लढत हा विषय कुठून आला, हे माहिती नाही. मात्र आम्ही आगामी निवडणूक आम्ही मविआ म्हणूनच लढू. राज्यात धनगरांना आरक्षण देऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री सांगतात. ओबीसी आरक्षणाचे नुकसान होईल, अशी भूमिका सरकार ने घेतलीय. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईमध्ये कुठल्या मुद्द्यावर वापस घेतलं, हे सांगितलं पाहिजे. मात्र आम्ही विरोधात असताना आमचीच भूमिका हे लोक विचरत असल्याचेही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.ओबीसी आंदोलन दाबण्याचा प्रकार हाकेच्या निमित्याने होत आहे. देशात गरिबाला नेहमी फसविले जाते. आपटे घरी व्हेज बिर्याणी खात असेल. मात्र पोलीस त्यांना अटक का करू शकत नाही? आरोपी आणि सहकार्य करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, आरोपी ला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले.

नितीन गडकरी हे कधी कधी सत्य बोलतात

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी हे कधी कधी सत्य बोलतात. मध्यप्रदेशात अर्थ खात्याने सांगितलं लाडकी बहीण योजना चालू शकत नाही. चार महिन्यात बंद केली. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली, मात्र ती इथे पण बंद होईल, असही विजय वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार 40 टक्केपर्यंत गेला आहे. भाजप लुटारूंची टोळी आहे, लुटा आणि वाटा हीच भाजपची नीती आहे. त्यात प्रत्येकाला हा रोग आहे. श्रद्धेवर घाला घातला जात आहे, साईबाबा ला लाखो लोक मानतात, संताला धर्माशी जोडू नये. तसेच व्होट जिहाद, लव्ह जिहाद हे बोलल्या शिवाय यांना मत मिळत नाही, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि सरकारवर निशाणा साधला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 02-10-2024