संगमेश्वर : आंबव पोंक्षे येथे निसर्गचित्रांचे प्रदर्शन

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथे श्री सूर्यनारायण मंदिरात निसर्ग चित्रांचे प्रदर्शन करण्यात आले होते.

माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या, माखजन इंग्लिश स्कूलमध्ये श्री अशोक काशिनाथ पोंक्षे कलादालनतर्फे जिल्हास्तरीय निसर्गचित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये सहभागी झालेल्या काही निवडक चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायणाच्या रथसप्तमी उत्सवाचे औचित्य साधून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री सूर्यनारायण संस्थेचे अध्यक्ष अशोक पोंक्षे, सचिव सतीश पोंक्षे, माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर साठे, सचिव दीपक पोंक्षे, शशिकांत घाणेकर, दीपक शिगवण, शिक्षक अमोल पाटील, ओंकार मुळ्ये, संतोष कुलकर्णी, गौरव पोंक्षे, अभिजित सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री सूर्यनारायण संस्थेचे अध्यक्ष अशोक पोंक्षे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सतीश पोंक्षे, अविनाश पोंक्षे, अशोक पोंक्षे, किशोर साठे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी तर आभार गौरव पोंक्षे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 04/Feb/2025