तरुणाला जबर मारहाण केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : दुकानात कामाला असलेल्या मुलीशी काहीतरी चाळे केल्याच्या रागातून तरुणाला जबर मारहाण केल्याप्रकरणी ९ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यश भाटकर, एक महिला, अक्षय भाटकर, अनिकेत मयेकर व इतर ५ जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात महेश मोहन गर्दे (४०, रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, महेश गर्दे यांनी त्याच्या दुकानात कामाला असलेल्या मुलीशी गैरप्रकार केल्याचा राग मनात धरुन संशयितांनी त्यांच्या दुकानात घुसून त्यांना लाथा-बुकक्यांनी जबर मारहाण करत त्यांच्या दुकानातील सामानाचेही नुकसान केले. या प्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १८९ (२), १९०, १९१(२), १२५ (अ), ११५(२), ३३२ (क), ३२४ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 02-10-2024