खेड : अग्निशमन केंद्राच्या आवारात नगरपालिकेची सर्वच वाहने उघड्यावर उभी केली जात होती. या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन केंद्राच्या आवारात निवाऱ्यासह संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. यासाठी आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्याने २९ लाख १२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन झाल्याने लवकरच वाहनांसाठी निवारा उपलब्ध होणार आहे.
येथील नगरपालिकेच्या कचरागाडया, पाण्याचा टैंकर व इतर वाहने अग्निशमन केंद्राच्या आवारासमोरच उभी केली जातात. केवळ अनिशमन बंबच इमारतीच्या खाली उभा केला जातो. आवारात उघड्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे चोऱ्यांसारखे अनुचित प्रकार घडत होते. याशिवाय ऊन- पावसामुळे वाहनेदेखील नादुरुस्त होत होती. ही बाब आमदार योगेश कदम यांच्या निदर्शनास आल्यानंतर वाहनांसाठी निवारा उभारण्यासाठी निर्णय घेतला.
त्यानुसार आमदार कदम यांनी पालिकेला तसा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या. पाठपुराव्यानंतर अग्निशमन केंद्राच्या आवारात निवाऱ्यासह संरक्षक भिंत उभारण्यासाठी २९ लाख १२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होताच आमदार योगेश कदम यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजनही करण्यात आले.
या प्रसंगी सचिन धाडवे, कुंदन सातपुते, सिद्धेश बेडेकर, पांडुरंग माने, शैलेश कदम, राजेश बुढाला, मिनार चिखले, भूषण चिखले, ओमकार तोडकरी, दीपक नलावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 02/Oct/2024














