चिपळूण : ५२ गावांतील गुरव समाजाचे संमेलन उत्साहात

चिपळूण : चिपळूण तालुका नितीवंत भाविक गुरव ज्ञाती समाजाचे २६ वे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात झाले. ५२ गावांतील गुरव समाजातील सुमारे ८०० जण उपस्थित होते. पिंपळी येथील गुरव समाजाच्या सभागृह परिसरात या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने गुरव समाजाने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने समाजातील वारकरी सांप्रदायातील चिपळूण तालुका आणि तालुक्याबाहेरील वारकरी मंडळीनी या सोहळ्यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे या अखंड हरिनाम सप्ताहात वारकरी मंडळींनी आपल्या कीर्तनरूपी सेवेचे योगादन दिले.

दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमामध्ये श्रींची पूजा, घटस्थापना, गाथापूजन, वीणापूजन, ध्वजारोहण, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, हळदी-कुंकू, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, दीपोत्सव, काकडा आरती, सत्यनारायणाची महापूजा, भजन आणि जीवन गौरव पुरस्कार आदी कार्यक्रमांचा समावेश होता. कुंभार्ली गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जाधव यांना यावर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 04/Feb/2025