मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगरानी यांनी अर्थसंकल्प सादर केला. मुंबई महापालिकेचा 2025-26 चा 74427.41 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय अंदाज गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढला आहे.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरभक्कम वाढ करण्यात आला आहे.
मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे बजेट 74 हजार 427 कोटी इतकं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्के वाढ आहे. 2024-25 च्या बजेटमध्ये 65 हजार 180 कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. कचरा संकलन कर संदर्भात अद्याप निर्णय नाही, कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
कोणत्या कामासाठी किती खर्चाची तरतूद
रस्ते व वाहतूक खात्याकरिता 2025- 26 या अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये 5100 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्प करिता 2025- 26 चा अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये 4300 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958 कोटी इतकी तरतूद केलीय.
मुंबई महापालिका आरोग्य खात्याचे बजेट 7379 कोटी आहे.
मुंबई महापालिका शिक्षण खात्याचं यंदाच्या वर्षीच बजेट 3955 कोटी रुपये असेल.
मिशन व्हिजन 27, मिशन संपूर्ण हे दोन मिशन मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याकडून राबवले जाणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीतील गाळेधारकांना मुंबई महापालिका कर भरावा लागणार आहे.
झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांना कर लागणार आहे. झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून सुमारे 350 कोटी इतका महसूल अपेक्षित आहे.
मुंबई महापालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या, त्यातील 20 टक्के झोपडपट्ट्यांमध्ये उद्योगधंदे दुकाने गोदाम हॉटेल्स अशा व्यवसायिक कारणासाठी वापर करण्यात येतो. या व्यवसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून मालमत्ता कर मुंबई महापालिका वसूल करणार आहे. यातून सुमारे 350 कोटी इतका महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे.
मुंबई पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजना
– राणी बागेचं नवं आकर्षण म्हणून राणी बागेत पेंग्वीन आणि वाघांनंतर जिराफ; झेब्रा; सफेद सिंह; जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार आहेत.
– मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटी देण्यात येणार आहेत.
– संजय गांधी नॅशनल पार्क च्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचे शिल्प उभारले जाणार आहेत.
– लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारले जाणार आहेत.
– काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विरास केला जाणार आहे.
बेस्ट साठी 1000 कोटींची तरतूद
मुंबई महानगर पालिकेकडून 2012-13 पासून जानेवारी 2025 पर्यत बेस्ट उपक्रमास 11304.59 कोटी इतक्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे. 2025-26 मध्ये 1000 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 04-02-2025














