मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत ‘एस. टी. बस स्थानक सखोल स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली. यावेळी एस. टी. आगार स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या सहकायनि संपूर्ण बसस्थानक परिसर स्वच्छता करण्यात आली.
यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, कार्यक्रमाधिकारी डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. विष्णू जायभाये, प्रा. शरिफ काझी, एस. टी. आगारातील कर्मचारी रामेश्वर कदम, सतीश शिंदे, राकेश पाटील, पी. बी. पाटकर, पी. पी. सुतार, विलास विटकर, व्ही. के. चैधरी, जी. के. भटलवार, भीमसेन लोखंडे, सागर विचारे, पत्रकार भरत सरफरे, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाधिकारी डॉ. महेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, आगार व्यवस्थापक एम. बी. जुनेदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. विष्णू जायभाये व स्वयंसेवक-स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 04/Feb/2025














