‘ब्रॅडींग’ करण्यात कोकणवासीय मागे…?

मंडणगड : कोकणातील पूर्वीपासून सेती व मत्स्य व्यवसाय हेच उदरनिर्वाहाचे साधन राहिले आहेत. येथील खानपानसुद्धा भात व मासे हेच आहे. येथील नैसर्गिक सौंदर्याबरोबर कोकणातील खानपान, राहणीमान याचबरोबर सांस्कृतिक परंपरा याचे पर्यटकांना कुतूहल आहे. काळाच्या ओघात यामध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल झाले. शेतीचे प्रमाण बहुतांशी कमी झाले आहे. मत्स्य व्यवसायात नैसर्गिक, अनैसर्गिक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या बाबींकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. मुळात जे कोकणचे ‘ब्रेडिंग’ आहे त्याची जपणूक करणे आवश्यक आहे. पर्यटनहष्ट्वा विकास करत असताना त्यास समांतर असणाऱ्या या बाबी फार महत्वाच्या आहेत. लोप पावत चाललेली सांस्कृतिक परंपरा हे कोकणाचे खरे वैभव मानले जाते व तिचे महत्व आबाधित ठेवणे महत्त्वाचे आहे.

पर्यटनदृष्ट्या कोकणचा विकास करताना येथील शेती, सांस्कृतिक, रूढी पंरपरा, चालीरीती सर्व काही कामी येणार आहे. शासनाने येथील कृषी पर्यटन, सेबा उद्योगांच्या विकासासाठी आगामी काळात जुने कायदे बदलून अनुकूल धोरण आखणे गरजेचे आहे. नकारघंटा वाजवण्याची वर्षानुवर्षाची मानसिकता कोकणवासियांच्या अंगळवणी पडली आहे. त्यामुळे बदल होण्यास विलंब लागला तरी चालेल, पण त्यासाठी उपाययोजनांची सुरुवात करावी लागणार आहे. समाज आपल्या नेत्यांचे अनुकरण करतो. बदलत्या काळात राजकारण हे समाज परिवर्तनाचे सर्वांत प्रभावी माध्यम बनले आहे. एकीकडे कोकणात रोजगार नसल्याचे कारण पुढे करुन येथील तरुण महानगरांमध्ये स्थलांतरीत होत असताना शेती व पुरक उद्योगांमध्ये राज्य व देशाबाहेरील मनुष्यबळ कोकणातही सक्रीय होताना दिसून आले आहेत.

कोकण रेल्वेच्या आगमनानंतर विकासाचे चाक आणखी जोमाने धावेल, अशी अपेक्षा होती तसे होतही आहे. पण कोकणाचे कोकणपण मात्र हरवू लागले आहे. कोकणी संस्कृतीने अनेक संस्कृती खानपानाच्या पद्धती आपल्या म्हणून अंगीकारल्या आहेत. कोकणात सर्वस उपलब्ध असणारे पंजाबी वा चायनीज फूड याचे उत्तम उदाहरण आहे. केरळ राज्यात पर्यटनांचा विकास झाला तो इडली डोसा या पदार्थावर हे पदार्थ आज जगप्रसिद्ध आहेत. अशी ओळख कोकणाच्या भात व माशांना मिळाली आहे का, जगात कोठेही जाऊन तुम्हाला हा पदार्थ मिळू शकतो का, या विषयी कोकणी पर्यटनावर बोलणाऱ्या सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे.

ब्रॅडींग’ करण्यात कोकणवासीय मागे…
कोकणचे ब्रॅडींग करण्यासाठी कोकणवासीय कमी पडले आहेत हे खरे आहे. भूतकाळातील चुका टाळून कोकण हा एक ब्रॅड म्हणून जगासमोर नेणे गरजेचे आहे व एखाद्या ब्रॅडला मिळालेली ओळख सहजासहजी पुसली जात नाही. टूथपेस्ट म्हणजे कोलगेट, थंड म्हणजे धम्सअप, पारले म्हणजे बिस्कीट या धर्तीवर कोकणाला ओळख देणारे बदलत्या काळातील ब्रॅड शोधणे गरजेचे आहे.

याकारिता वैयक्तिक व अगदी
सार्वजनिक पातळीवरही होत असलेल्या प्रयत्नांना आता राजसत्तेचे पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे. कोकण विकासाचा अभ्यास हा कागदावर व त्याचे नियोजन प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी आवश्यक असलेली सता व राजकीय पाठबळ कधी नव्हे ते उपलब्ध झाले आहे. यासाठी येथील नेत्यांनी परस्परातील भेद, राजकीय स्वार्थ फायदे बाजूला ठेवून कोकणचा विकास हा आपल्या अजेड्यांवरचा विषय बनविणे गरजेचे आहे. कोकणात रस्ते व पायाभूत क्षेत्रात इवलेल्या गंतवणुकीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याच्या कालावधीत कोकणातील राजकारण्यांनी विकासाकरिता एकत्रित मार्गक्रमण गरजेचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 04/Feb/2025