कोकणातील हॉटेल व्यावसायिकांसाठी दापोलीमध्ये कार्यशाळा

दापोली : कोकणातील हॉटेल व्यावसायिकांना कसा फायदा होईल, व्यवस्थापन कसे असले पाहिजे याचे प्रशिक्षण लाडघर पर्यटन विकास संस्थेने आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत प्रात्यक्षिकांद्वारे दाखवण्यात आले.

कोकण पर्यटनाचा शाश्वत विकास, ग्रामीण कोकण व पर्यटनाच्या संधी, कोकणातील जैवविविधता, आदरातिथ्य व हॉटेल व्यवस्थापन या विषयांवर ही कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत लाडघर येथील ५० पेक्षा अधिक हॉटेल व्यावसायिक सहभागी झाले होते. या वेळी व्यावसायिक नरेश पेडणेकर, मंगेश मोरे व दीपक विचारे उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी प्राध्यापक कुणाल मंडलिक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या प्रकारच्या कार्यशाळा कोकणातील व्यावसायिकांना गरजेच्या असून, त्याचे सातत्याने नियोजन होणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित व्यावसायिकांनी केले. अशा प्रकारच्या कार्यशाळेनंतर कोकणातील व्यावसायिक समृद्ध होऊ शकतील, असा विश्वास पेडणेकर यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 02/Oct/2024