दापोली : राज्यात जी. बी. एस. आजाराचे रुग्ण वाढत असून, हा आजार दूषित पाण्यामुळे होत आहे, असा निष्कर्ष काढला जात आहे. असे असताना दापोली तालुक्यातील उंबरशेतमधील विहिरींच्या दूषित पाण्याकडे शासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल येथील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
येथे उत्खनन करणाऱ्या आशापुरा मायनिंग या कंपनीचा त्रास येथील ग्रामस्थ १९ वर्ष सहन करत आहेत. मात्र कंपनीवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जातेय का? असा ही सवाल येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. उंबरशेत परिसरामध्ये आशापुरा मायनिंग ही कंपनी उत्खनन करत आहे. या उत्खननाच्या धुळीने सार्वजनिक नळपाणी योजनांच्या विहिरींचे पाणी दूषित होत आहे. या दूषित पाण्याने साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
राज्यामध्ये सर्वाधिक जीबीएस आजाराचे रुग्ण पुण्यात आढळले आहेत. हा आजा दूषित पाण्यामुळे होतो, असा निष्कर्ष राज्यक आणि आरोग्य विभागाने काढला आहे. दरवर्ष गावाला भेडसावणारी पाणी समस्या आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत शासन दरबारी कैफियत मांडूनदेखील लक्ष दिले जात नाही, असे ग्रामस्थ वारंवार सांगत आहेत. येथील धुळीने शाळकरी मुलांचे आरोग्य बिघडत आहे. वार्षिक उत्पन्न देणाऱ्या फळझाडांची फळधारण क्षमता कमी झाल आहे. रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस दयनीन आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 05/Feb/2025














