लांजा : लांजा बसस्थानक परिसरात सोन्याचे मंगळसूत्र व चांदीचे पैंजण असलेली पर्स एका महिलेला सापडली. या महिलेने पर्स लांजा पोलिस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी सत्कार करून तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. सोमवारी सकाळी लांजा बसस्थानक आवारात पर्स मिळाली होती.
शोभा दत्ताराम गुरव (रा. खानवली गुरखवाडी, (ता. लांजा) यांना लांजा बसस्थानक प्रवेशद्वार रस्त्यावर दागिने असलेली पर्स मिळाली. ही पर्स त्यांनी लांजा पोलीस ठाण्यामध्ये जमा केले. पोलिसांनी पर्स मालकांचा शोध घेतला असता लांजा तालुक्यातील वनगुळे गुरववाडी येथील विनिता विकास गुरव यांची असल्याचे समजले. त्यांनी लांजा पोलिस ठाणे येथे येऊन पर्स ताब्यात घेतली. पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे पैंजण व रोख रक्कम असा ऐवज होता. शोभा दत्ताराम गुरव यांनी प्रामाणिकपणा दाखवत दागिन्यांची पर्स परत केल्याबद्दल लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी शोभा गुरव यांचा सत्कार करून आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 05/Feb/2025














