रत्नागिरी : भाड्याचे राहिलेले पैसे न दिल्याच्या रागातून एकाला दोघांनी मारहाण केली. ही घटना मंगळवार २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा. गयाळवाडी येथे घडली.
अतुल हनुमंत लाड (रा. आरटी.ओ रोड, रत्नागिरी), सागर किशोर पालकर (रा. पांडवनगर, नाचणे रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सुशांत रवींद्र हिरे (३६, रा. गयाळवाडी निलांबरी अपार्टमेंट, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरुन दोघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), १२६ (२),११५, ३५२, (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 02-10-2024