देवरूखमध्ये ‘भारत जोडो’ अंतर्गत प्रशिक्षण

चिपळूण : भारत जोडो अभियानतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा कार्यकर्ता प्रशिक्षण ७ ऑक्टोबरला सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत देवरूख येथील मातृमंदिर येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमात उल्का महाजन, मुक्ता श्रीवास्तव, राजेंद्र चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. या बरोबरच महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांसोबत समन्वय, मतदार संघनिहाय कार्यधोरण निश्चित करणे, पोलिंग बूथ व्यवस्थापन, मतदार याद्या तपासणे, प्रचारयंत्रणा प्रभावीपणे चालवणे, सोशल मीडिया हाताळणी, जनतेचा आग्रहनामा, जिल्हा व तालुका समिती समन्वय आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

हे प्रशिक्षण जिल्हास्तरावरील असल्याने राजापूर ते मंडणगड या सर्व तालुक्यातून कृतिशील कार्यकर्ते, युवा आणि महिला यांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन राजन इंदुलकर, निखिल भोसले (चिपळूण), माधव शेटे, सचिन तोडणकर (दापोली), पंकज दळवी, सुदेश हडकर (गुहागर), युयुत्सू आर्ते, विलास कोळपे (संगमेश्वर), विजय मोरे (खेड), गणेश बिल्लार, राजेश समेळ (मंडणगड), नाना मानकर, बबन मयेकर (लांजा), अभिजित हेगशेट्ये (रत्नागिरी) यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 02/Oct/2024