रत्नागिरी : संविधान समाज जोडो अभियान कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर रविवारी

रत्नागिरी : भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी अंतर्गत तालुका शाखा रत्नागिरी यांच्या विद्यमाने रविवारी (९ फेब्रुवारी) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर शहरातील मारुती मंदिर येथील शेषाराम हॉल या ठिकाणी होणार आहे. सर्व ग्रामशाखांचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा रत्नागिरीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 06-02-2025