प्राथमिक शिक्षक संघ राज्य कार्याध्यक्षपदी संतोष कदम यांची निवड

चिपळूण : कोकणचे सुपुत्र व प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन संतोष वसंत कदम यांची एकमताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे कोकणला राज्यस्तरावर नेतृत्वाची प्रथमच संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल कदम यांचे अभिनंदन होत आहे.

शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा नुकतीच गोंदवले (सातारा) येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी ही निवड जाहीर करण्यात आली. गत ५ वर्षातील राज्य संघटनेबरोबरचा समन्वय, राज्यातील सर्वात चोख आणि प्रामाणिक आर्थिक हिशोब देणारा जिल्हा, जिल्हा संघटनेचा चालवलेला शिस्तीचा कारभार, तालुका संघटनेकडे असणारे लक्ष आणि २०२३ मधील यशस्वी रत्नागिरी शिक्षण परिषद या बाबींचा विचार करून कदम यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 06/Feb/2025