राजापूर : देवीहसोळातील आर्यादुर्गा मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

राजापूर : तालुक्यातील प्रसिद्ध देवीहसोळ येथील प्रसिद्ध श्री आर्यादुर्गा श्री जाकादेवी मंदिरात यंदा नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. गुरुवारपासून (ता. ३) नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मंदिरामध्ये नवरात्रोत्सवामध्ये दररोज विविध कार्यक्रम होतील. त्यात सकाळी ७ वा. पूजापाठ, ९ वा. अभिषेक, ११ वा. महानैवेद्य, रात्री ८ वा. महाआरती, ९ वा. श्री रामचंद्र पाध्ये गुरुजी यांचे पोथीवाचन, ९.३० वा. तन्मय सिनकर यांचे कीर्तन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले आहेत. त्यात येत्या गुरुवारी (ता. ३) देवीहसोळ येथील रासगरबावा, शुक्रवारी (ता. ४) देवीहसोळ येथील नरेंद्र महाराज सत्संग भजन मंडळाचे सुस्वर भजन, शनिवारी (ता. ५) पिशेदेवाडी येथील श्री गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळाचे भजन (बुवा अनंत खानविलकर), रविवारी (ता. ६) भालावली येथील जाकादेवी प्रासादिक भजन मंडळाचे भजन, ७ ला देवीहसोळ लिंगवाडी भजन मंडळाचे भजन, ८ ला श्री आर्यादुर्गा सेवा मंडळ भूचा टिपरी खेळ, ९ ला कलादेवी महिला नाचमंडळ, भू (कुंभारवाडी) यांची फुगडी, १० ला सायंकाळी ३ वा. हळदी-कुंकू समारंभ, ५ वा. देवीहसोळ येथील महिला मंडळाची फुगडी, रात्री ७ वा. श्री आर्यादुर्गा प्रासादिक भजन मंडळ गुरववाडीतील भजन, ११ ला सकाळी ९ वा. नवीन भक्तनिवास उ‌द्घाटन सोहळा, १० वा. होमहवन, सायंकाळी आरती स्पर्धा, १२ ला कुमारीपूजन, ललित, रात्री १० वा. भालावलीचे भजन या कार्यक्रमांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:08 PM 02/Oct/2024