खेड : खेड-दापोली मार्गावरील बहिरवली फाट्यानजीक बुधवारी सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या अपघातात दापोली तालुक्यातील वाकवली येथील अमोल बाबू पवार (४९), विनोद बाबू पवार (२५) हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून कलंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा गेला.
अपघातामुळे काही काळ वाहतूक देखील खोळंबली होती. ट्रॅक्टरचालक चिंचघर वीटभट्टीवर काम करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पसार चालकाचा येथे स्थानिक पोलिसांकडून शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शिवाय अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामुळे अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला सुरू नाही. मात्र, दोन्ही गंभीर जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी चिपळूण तालुक्यातील डेरवण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 07/Feb/2025














