रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिक कट्टातर्फे १४ फेब्रुवारीला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर

रत्नागिरी : विठ्ठल रखुमाई मंदिर संस्था बाजारपेठ ज्येष्ठ नागरिक कट्टातर्फे १४ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता मंदिरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कनिष्ठ अनुवाद अधिकारी सीमाशुल्क विभागाचे सत्यवान रेडकर मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यार्थ्यांनी वही पेन घेऊन या ठिकाणी उपस्थित राहावे आणि चांगल्या संधीचा फायदा घ्यावा. या कार्यक्रमासाठी श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचे खजिनदार प्रमोद रेडीज, संयोजक सुरेश लिमये, समाजभूषण सुरेंद्र घुडे, भजनीबुवा दत्ताराम लिंगायत, शिरीश वारंग, अरविंद वांदरकर, राजन जाधव, बबन मलुष्टे यांचे सहकार्य लाभले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 07/Feb/2025