Khed News : ज्ञानदीप महाविद्यालयात ‘मी IAS अधिकारी होणारच’ या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा

खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य मोरवंडे-बोरज येथे ‘मी IAS अधिकारी होणारच’ या विषयावर एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.

ज्ञानदीप महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्या भविष्यातील करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. याचाच भाग म्हणून ज्ञानदीप महाविद्यालय व मिशन आयएएस यांच्या संयुक्त विद्यमाने. ३० सप्टेंबर रोजी ‘मी आयएएस अधिकारी होणारच’ या विषयावर एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिशन आयएएस या संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे उपस्थित होते. प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा तसेच आयएएस अधिकारी बनण्यासाठी आत्मसात करावयाच्या महत्वाच्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांची योशोगाथा व त्यांनी केलेला खडतर प्रवास याबद्दल विद्यार्थ्यांना अवगत करून आयएएस, आयपीएस तसेच कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला अभ्यासामध्ये झोकून देणे गरजेचे असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विविध विषयांचा अभ्यास कसा करावा, त्याच्या नोट्स कशा लिहाव्यात याबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना महत्वाचे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी प्रमुख मार्गदर्शक प्रा. नरेशचंद्र काठोळे यांचे स्वागत प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. प्रिया बावकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 02/Oct/2024