नवी दिल्ली : Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज शनिवारी (दि. 08) जाहीर होणार आहेत. दिल्लीत आप (AAP), भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) अशी तिरंगी लढत झाली आहे. निवडणूक निकालापूर्वी भाजप आणि आप या दोन्ही पक्षांनी दिल्लीत विजयाचा दावा केला आहे.
सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप आणि आपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाले होते. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले आहे. 2020 च्या तुलनेत यावेळी दिल्लीत 2 टक्के कमी मतदान झाले आहे. निवडणुकीत 60.92 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे. अरविंद केजरीवाल हे विजयाची हॅट्ट्रिक करणार की भाजप 27 वर्षांनी दिल्लीमध्ये सत्तांतर करण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 08-02-2025














