रत्नागिरी : शहरातील मांडवी बीच ते नाईक फॅक्टरीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या दोघां विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.४५ ते ८ वा. कालावधीत करण्यात आली. परिमल महेंद्र मायनाक (२८) आणि रोहित संतोष चव्हाण (२६, दोन्ही रा. खालची आळी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, हे दोन्ही संशयित सार्वजनिक रस्त्यावर आपल्या पुढ्यात दारुचे ग्लास घेउन बसलेले असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 08/Feb/2025














