माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो वारकऱ्यांची मांदियाळी !

पंढरपुर : वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणाऱ्या माघी वारीचा महत्त्वाचा व मुख्य दिवस म्हणजे माघी एकादशी. या एकादशीसाठी लाखो भाविक खेडोपाड्यातून गावोगावातून पांडुरंगाच्या दर्शनाला आले आहेत .

माघी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या तीरावर हजारोंच्या संख्येने भाविक पोहोचले आहेत.

एका मिनिटात अंदाजे 27 च्या आसपास भाविक विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेत आहेत.

पहाटेपासून चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

हरिनामाच्या गजरात भक्तांची मांदियाळी पुन्हा एकदा पंढरपुरात जमली आहे.

मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला आहे .पंढरपुरात चंद्रभागेत स्नानासाठी तुडुंब गर्दी झाली आहे.

माघ महिन्यातील या एकादशीचे वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व आहे .या दिवशी भगवान विष्णूची पूजा करत वारकरी उपवास धरतात

चंद्रभागेत स्नान करून दानधर्म करण्याकडे भक्तांचा कल असतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 08-02-2025