जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेसाठी वेलदूर घरटवाडी शाळेची निवड

गुहागर : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वेलदूर घरटवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रभू हंबर्डे व ऋषभ धोपट, विप्लव घरट, राही आगिवले या विद्यार्थ्यांची सी. एस. हॅकेथॉन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. दि. १० फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेणार आहेत.

२०२४ – २५ या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या सीएस हॅकेथॉन प्लग्ड कार्यक्रमासाठी नोंदणी केलेल्या हजारो सहभागींपैकी निवडलेल्या अंतिम स्पर्धकांमध्ये निवड झाल्याबद्दल या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी रायचंद्र गळवे, शिक्षण विस्ताराधिकारी नामदेव लोहकरे, केंद्रप्रमुख आरोही शिगवण यांनी जिल्हास्तरीय सीएस हॅकेथॉन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतर्फे शिक्षक प्रभू हंबर्डे व तीनही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक रमेश शिंदे, वेलदूर ग्रामपंचायत उपसरपंच राजू जावळे, गाव अध्यक्ष आरकेश घरट, गणपत धोपट, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जावळे, उपाध्यक्षा श्रुती घरट, सर्व सदस्य, शिक्षक किरण सूर्यवंशी, मानसी जोशी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 10/Feb/2025