संगमेश्वर : तुळसणी ग्रामपंचायतीच्या इमारतीचे आ. शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन

संगमेश्वर : तुळसणी ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या नमो – ११ सूत्री कार्यक्रमांतर्गत या इमारतीस ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

या इमारतीमुळे सर्वच गावस्तरीय शासकीय व अन्य कामे एकाच इमारतीमधून होणार असल्याने आ. शेखर निकम यांनी समाधान व्यक्त करीत येथील सरपंच व ग्रामस्थांचे कौतुक केले. सोबतच ग्रामपंचायतीस सुशोभिकरणासाठी आवश्यक वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. हा विश्वास या कार्यक्रमप्रसंगी ग्रामस्थांना दिला.

यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, प्रभारी सरपंच सुमील बेर्डे, उपअभियंता जि. प. बांधकाम विभाग देवरुखचे हणमंत शिवपुरे, शाखा अभियंता शिरिषकुमार गायकवाड, विस्तार अधिकारी घुले, प्रफुल्ल बाईत, शेखर उकार्डे, गजानन सुर्वे, निलोफर मुकादम, बाळकृष्ण चव्हाण, स्मिता सुर्वे, तृप्ती गुरव, प्रकाश सुर्वे, श्रीपत मोहिते, सीताराम आग्रे, वैदही बने, परशुराम घडशी व ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 10/Feb/2025