रत्नागिरी : दारू का पिता, असे विचारल्याच्या रागातून पत्नीला लादी पुसण्याच्या मॉपने मारहाण केली. याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वा. सुमारास एस.टी. कॉलनी येथे घडली. किशोर शांताराम पांचाळ (५०, रा. एस. टी. कॉलनी माळनाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नीने तक्रार दिली आहे.
त्यानुसार, शनिवारी सायंकाळी किशोर पांचाळ हा घरी दारु पित असल्याचे पाहून तिने तुम्ही दारू कशाला पिता, असे विचारले. याचा राग आल्याने पती किशोरने तिला घरातील लादी पुसण्याच्या मॉप स्टिकने कपाळावर मारून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 10/Feb/2025














