स्वप्नील घाटकर ठरला कै. गिरीधर मांजरेकर स्मृती बॉडी बिल्डिंग चषकाचा मानकरी

चिपळूण : येथे नुकत्याच आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद बॉडी बिल्डिंग स्पर्धेत स्वप्नील घाटकर (पाटील जिम पावस) हा कै. गिरीधर मांजरेकर स्मृती बॉडी बिल्डिंग चषकाचा मानकरी ठरला. गणेश गोसावी (पवार्स जिम, सावर्डे) याने उपविजेतेपद पटकावले.

रत्नागिरी कुमार सुयोग पदमुले (स्टॅलियन जिम, खेड), रत्नागिरी उदय ओंकार कोळेकर (ओंकार जिम, दापोली), रत्नागिरी श्रीमान प्रवीण कांगणे (ओंकार जिम, दापोली), रत्नागिरी मेन फिजिक्स आतिश विचारे (भैरी भवानी जिम, सावर्डे) हे गटविजेते निवडण्यात आले.

कै. गिरीधर सखाराम मांजरेकर स्मृती फिरता चषक व रोख ३१ हजार रुपये कै. गिरीधर यांचे मित्र कै. सदुभाऊ पाटणकर यांच्या स्मरणार्थ व रोख २१ हजार रुपये मांजरेकर कुटुंबियांकडून देण्यात आले. तसेच कै. लक्ष्मण उर्फ आबा भिडे व कै. ना. द. लिमये यांच्या स्मरणार्थ रोख पारितोषिक देण्यात आले. आदर्श क्रीडा व सामाजिक प्रबोधिनी संस्थेचे (चिपळूण) अध्यक्ष भैय्या कदम यांच्या वतीने स्पर्धकांना भोजनाची सोय करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये सुमारे १२५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेसाठी चिपळूणमधील क्रीडा प्रेमी बहुसंख्येने हजर होते.

पंच म्हणून शैलेश जाधव, जितेंद्र नाचणकर, किशोर पाटील, अंकुश कांबळे, भारत बजागे, नंदू शिंदे, राज नेवरेकर, संजय रावणांग, नरेंद्र वणजू, करमरकर, मोहिते, कडवईकर व सदानंद जोशी यांनी काम पाहिले.

स्पर्धेसाठी आदर्श प्रबोधिनीच्या सर्व सभासद, कार्यकर्त्यांनी मदत केली. तसेच दिवाकर आडविरकर, विरेंद्र वणजु आणि पोलीस व महावितरण व प्रशासन यांचे उत्तम सहकार्य लाभले. बक्षीस समारंभ सचिन उर्फ भैय्या कदम, यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:51 PM 10/Feb/2025