रत्नागिरी : शहरानजीकच्या शिरगावमधील आदिष्टीनगर येथील तरुणीने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार, ९ फेब्रुवारी रोजी रोजी रात्री १२.३० वा. सुमारास उघडकीस आली.
रसिका शांताराम सनगरे (२४, रा. आदिष्टीनगर मजगाव रोड, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. रविवारी रात्री तिने घरच्यांसोबत जेवण केल्यानंतर रात्री ९ वा. सुमारास ती आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेली होती. त्यानंतर रात्री १२.३० वा. सुमारास तिचा भाऊ कामावरून घरी आला असता, त्याला रसिका ही तिच्या खोलीत फॅनला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने आरडा-ओरडा केल्यानंतर घरातील इतर नातेवाईकांनी रसिकाच्या खोलीत धाव घेतली. सर्वांनी मिळून रसिकाला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 11/Feb/2025













