रत्नागिरी : मिरकरवाडा बंदर परिसर पूर्णपणे मोकळा झाल्यानंतर आता तेथील सुरक्षित जागांचा मासळी सुकवण्यासाठी उपयोग होऊ लागला आहे. त्यामुळे बंदरावरील काही मोकळ्या जागांवर मासळी दिसू लागली आहे.
मिरकरवाडा बंदर परिसरातील अनधिकृत शेड, बांधकामांच्या ठिकाणी मासळी सुकवली जात होती. परंतु दि. २७ आणि २८ जानेवारी रोजी येथील अतिक्रमण हटवल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधूनमधून बंदरावर येऊन पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी पाहणी केली. त्यामुळे त्याठिकाणी कोणतेही अतिक्रमण नव्याने होऊ शकलेले नाही.
मिरकरवाडा बंदरातील मोकळ्या जागेवर आता मासळी सुकवण्यासाठी पसरवून ठेवली जाऊ लागली आहे. यापूर्वी शेडमध्ये आणि रस्त्याच्या आजूबाजूला मासळी सुकवण्यासाठी ठेवली जात होती. यासाठी आता बंदरावरील मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 11/Feb/2025














