चिपळूण : चिपळूण शहराच्या ग्रॅव्हिटी योजनेसंदर्भात पीएमसी नेमणूक व्हावी, या संदर्भात नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेले पत्र गैरसमजूत व अपुऱ्या माहितीच्या आधारे दिले असून हे निवेदन आपण मागे घेत असल्याचे स्पष्टीकरण माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केले आहे. याबाबत मुकादम यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, नगर परिषदेला शहराच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेसंदर्भात आपण पीएमसी नेमणूक करण्याबाबत तसेच पाणीपुरवठा विभागात अभियंता नियुक्त करण्याबाबत पत्र दिले. तोपर्यंत हे काम स्थगित ठेवावे, अशी मागणी केली होती. मात्र, या बाबत न.प. कडून माहिती घेतली असता आपण मुख्याधिकाऱ्यांना दिलेले निवेदन गैरसमजुतीने व अपूर्ण माहितीच्या आधारे दिले आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत असून निवेदन मागे घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न.प. प्रशासनाने योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी योजनेवर देखरेख करण्यासाठी पीएमसीची नियुक्ती केली आहे. तसेच मुख्याधिकारी यांनीदेखील पाणीपुरवठा विभागाला अभियंता मिळावा यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करून प्रयत्न व पाठपुरावा केला आहे. त्यामुळे आपण दिलेले निवेदन मागे घेत असून दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे स्पष्टीकरण मुकादम यांनी दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 11/Feb/2025














