खेड : तालुक्यातील एका गावातील तरुणीस ब्लॅकमेल करत शिवीगाळसह ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताच्या मुसक्या पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सातारा येथे आवळल्या. महेंद्रकुमार दुज्जी भारतीया (३१, रा. प्रयागराज-उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
महेंद्रकुमार महामार्गावरील स्वाद नामक बेकरीत संशयित कामाला होता. त्याने पीडित तरुणीचे फोटो स्वतःच्या फेसबुक अकाऊंटमध्ये अपलोड केले होते. त्यानंतर तरुणीला व्हॉटस्अॅपवरून सतत एसएमएस करत मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यानंतर २४ जानेवारी रोजी मोबाईलवरून कॉल करत अश्लील भाषेत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली होती. संशयिताकडून सतत ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न सुरू होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:41 11-02-2025














